Thursday, November 12, 2009

माझा मराठी ब्लॉग

माझा मराठी बोल कौतुके | परी अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन |
असे संत ज्ञानेश्वर म्हणाले होते. त्यांचे स्मरण करून मीही काही मराठी अक्षरे मेळवीन असे म्हणतो.


अर्थात् हा एक प्रयत्न आहे.

लोक हिमालयावर का आरोहण करतात? तर, तो हिमालय तिथे आहे म्हणून. नाही तर कशाला कोण तिथे गेला असता? तसेच, मी ब्लॉग का लिहितो? तर ब्लॉग लिहिण्याची सोय उपलब्ध आहे म्हणून. आणि खरे सांगायचे तर मला पांढर्यावर काळे खरडायची हौस आहे. म्हणून हा ब्लॉग प्रपंच. 'ब्लॉग लिहितो' एवढया अर्हतेवर मला 'साहित्य सहवास' मध्ये जागा क्लेम करता येईल.. किंवा निदान स्वतःला साहित्यिक म्हणवता येईल असाही एक सुप्त विचार... असो.

No comments:

Post a Comment